Skip to product information
1 of 32

Majestic Emporium with IJC (Ishwarbhai Joshi Consultancy)

पाच एकांकिका: नाट्य आणि दिग्दर्शन टिपां सह Paach Ekankika (Drama with Directions)

पाच एकांकिका: नाट्य आणि दिग्दर्शन टिपां सह Paach Ekankika (Drama with Directions)

Regular price Rs. 583.00
Regular price Rs. 645.00 Sale price Rs. 583.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

पाच एकांकिका: नाट्य आणि दिग्दर्शन टिपां सह

यात एकांकिकांची केवळ पारम्पारीक संहिता नसून, दिग्दर्शन, संगीत, ध्वनी योजना, नेपथ्य याचे देखील सखोल मार्गदर्शन प्रत्येक प्रवेशानुसार दिले गेले आहे. त्यामुळे हा अप्रतिम ग्रंथ आपल्या संग्रही असायलाच हवा!

या सर्व संहिता - शाळा, महाविद्यालये किंवा स्पर्धांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.  

1.कौटुम्बिक हृदयस्पर्शी

2.फार्सिकल कॉमेडी

3.भयकथा

4.प्रेरणादायक

5.सामाजिक भावनिक

अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, अवधी सांस्कृतिक जीवनात माझा सहभाग आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांना (गॅदरिंग) मला आवर्जून बोलावले जाते. या कार्यक्रमांमध्ये जेव्हा एकांकिका सादर होतात, तेव्हा मला खूप वाईट वाटते.

कधी कधी त्या एकांकिका प्रथितयश नाटककारांच्या उत्कृष्ट संहिता असतातही, पण त्यांचे सादरीकरण पाहताना मन खट्टू होते. कारण ते अत्यंत साधे आणि कल्पनेच्या कसोटीवर बावळट म्हणावे लागेल, अशा स्वरूपाचे असते. याचे मूळ कारण शोधताना माझ्या लक्षात आले की, जे गुरूजन हे नाटक बसवतात, त्यांना व्यावसायिक नाटकांप्रमाणे दिग्दर्शन, नेपथ्य (रंगमंच सजावट), प्रकाशयोजना किंवा ध्वनी नियोजन या तांत्रिक आणि कलात्मक बाबींचे योग्य मार्गदर्शनच नसते.

याच दरम्यान, 'सोसायटीतल्या गणेशोत्सवासाठी' किंवा अशाच लहान-सहान सादरीकरणांसाठी लहान मुले माझ्याकडे खूप आशेने येत. मी लेखक असल्याने, साहजिकच ते संहिता मागत. त्यांना त्यांची नाटुकली अगदी उद्या-परवा सादर करावयाची असे, त्यामुळे त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून मीही कागदावर काही पाने खरडून देत असे. अशा जवळजवळ चाळीस- बेचाळीस कथाबीजे आणि छोट्या नाटुकल्या माझ्याकडे पडून होत्या.

काही दिवसांपूर्वी माझ्या मनात आले की, नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा, एकांकिकांचे दिग्दर्शन किंवा ध्वनी नियोजनाविषयी तळमळ व्यक्त करण्यापेक्षा, आपल्याच काही नाटुकल्यांना एकांकिकेचे पूर्ण स्वरूप देऊन, प्रत्येक प्रवेशानुसार सूक्ष्म मार्गदर्शन का करू नये?

मग ह्या संहिता लिहिताना, माझ्या मनाच्या पटलावर केवळ पात्रे नव्हे, तर सम्पूर्ण नाटकच सरकू लागले. मग ते सर्व बारकावे मी लिहून वेगळे ठेवू लागलो. आणि नंतर ती सर्व माहिती 'जिग-सॉ-पझल'सारखी जुळवली. त्याचा परिणाम खरंच अफलातून आला.

माझ्या काही रंगभूमीवरील मित्रांना मी या पुस्तकाचे टाचण दाखवले. ही कल्पना त्यांना अतिशय आवडली. कारण अशा पद्धतीने प्रत्येक तांत्रिक बाबींचा समावेश असलेले सम्पूर्ण मार्गदर्शक पुस्तक आजवर उपलब्ध नाही, असा अभिप्राय त्यांनी नोंदवला.

माझे एक मित्र (परेश रावल) तर म्हणाले, "एका लेखकानेच संहिता लिहावी आणि छोट्या-मोठ्या सूचना द्याव्यात, असाच अद्यापचा संकेत होता. पण तुम्ही अनेक तांत्रिक बाबींवर सखोल माहिती दिल्याने हे पुस्तक येणाऱ्या पुढील नाटककारांसाठी केवळ संहिता मार्गदर्शक नव्हे, तर एक संपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल. की एकांकिका किंवा नाटक किती सखोल पद्धतीने लिहिता येते..."

अनेक विषय असल्यामुळे कुणालाही त्यातील एखादी एकांकिका सहज उचलता यईल.

एक सामाजिक सेवा म्हणून या संहिता लिहिलेल्या आहेत सबब या कुणालाही फुकट वापरता येतील. हेतु असा की या निमित्तानं माझाही खारीचा वाटा मी उचलावा. फक्त व्यावसायीक उपयोग करायचा असल्यास लेखकाची परवानगी घ्यावी. 

तुम्ही स्वत: हे पुस्तक शाळा, महाविद्यालये यांना भेट स्वरूप देऊ शकता.

लेको, तुमच्या हाती हिरा देत आहे. त्याला यशस्वी सादरीकरणाचे कोंदण द्या. अन हो, तुमच्या कार्यक्रमाचे फोटो, 9512817623 या क्रमांकावर जरूर व्हाटसअप करा.

'पाच एकांकिका: नाट्य आणि दिग्दर्शनाचा दीपस्तंभ'

'पाच एकांकिका: नाट्य आणि दिग्दर्शन टिपां सह'

१. अनेक वर्षांच्या नाट्य-अनुभवातून आलेली ही पाच एकांकिकांची संहिता नाही, तर प्रत्येक नाट्यप्रेमीसाठी हा एक अमूल्य ठेवा आहे.

२. महाराष्ट्राच्या ग्रामीण-सांस्कृतिक जीवनातील सादरीकरणातील उणिवा (कमतरता) डॉ. ईश्वर भाई जोशी यांनी प्रथमच दूर केल्या आहेत.

३. ही एकांकिकांची केवळ पारंपरिक कथा-संहिता नाही; हे आहे संपूर्ण नाट्य-दिग्दर्शनाचे सूक्ष्म मार्गदर्शन!

४. प्रत्येक प्रवेशानुसार नेपथ्य, ध्वनी योजना, प्रकाशयोजना आणि अभिनयाच्या बारकाव्यांवर सखोल मार्गदर्शन प्रथमच उपलब्ध झाले आहे.

५. शाळेतील गुरुजनांना व्यावसायिक नाटकाप्रमाणे उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी हे पुस्तक म्हणजे एक 'सिद्धमंत्र' ठरेल.

६. 'कौटुंबिक हृदयस्पर्शी' ते 'फार्सिकल कॉमेडी' आणि 'सामाजिक भावनिक' यासारख्या विविध विषयांवरील एकांकिका यात आहेत.

७. शून्य अनुभवाचा विद्यार्थीही या मार्गदर्शनाने भव्य नाट्यकृती उभी करू शकतो.

८. लेखक सांगतात: "माझ्या मनात फक्त पात्रे नव्हे, तर संपूर्ण नाटकच आकार घेत होते," आणि ती सर्व अनुभूती या पानांत उतरवली आहे.

९. लहान मुलांच्या आशेवर पाणी फिरू नये म्हणून सुरू झालेला हा लेखनप्रवास आज एका ऐतिहासिक दस्तऐवजात बदलला आहे.

१०. प्रख्यात रंगकर्मी मित्रांनीही मान्य केले आहे की, अशा तांत्रिक बाबींसह मार्गदर्शन करणारा ग्रंथ आजवर उपलब्ध नव्हता.

११. हे पुस्तक पुढील नाट्य-लेखकांसाठी आणि दिग्दर्शकांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक संहिता ठरणार आहे.

१२. शिक्षण संस्थांसाठी सामाजिक सेवा म्हणून या संहिता विनामूल्य उपलब्ध आहेत.

१३. 'केवळ संहिता नव्हे, तर एकांकिका किती सखोल पद्धतीने लिहिता येते,' हे या ग्रंथातून सिद्ध होते.

१४. लेखकाचा हा 'खारीचा वाटा' समाजाला समर्पित आहे; फक्त व्यावसायिक उपयोगासाठी परवानगी आवश्यक.

१५. " तुमच्या हाती हिरा दिला आहे! त्याला यशस्वी सादरीकरणाचे कोंदण द्या!" या आवाहनासह या ज्ञानग्रंथाला आपल्या संग्रहात स्थान द्या.

  1.  

Quality Assurance

Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.

Shipping

We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.

Delivery Timeline

Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:

  • Standard Shipping: 5-7 business days

Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.

Moneyback Guarantee!

Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.

Return Policy

You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.

The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.

In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:

  • By email: sales.majestyemporium7@gmail.com
View full details
  • Lowest Price offered!

  • Enjoy Free & Fast Shipping

  • Cash On Delivery Available!