Skip to product information
1 of 41

Ishwarbhai Joshi Consultancy

आध्यात्मिक जागरण अर्थात -आत्म शोधाचा एक प्रवास Adhyatmik Jagaran

आध्यात्मिक जागरण अर्थात -आत्म शोधाचा एक प्रवास Adhyatmik Jagaran

Regular price Rs. 586.00
Regular price Rs. 885.00 Sale price Rs. 586.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

हा ग्रंथ सामान्य वाचकांसाठी नाही. केवळ प्रगल्भ आध्यात्मिक गुरुंसाठी हा चितनात्मक ग्रंथ आहे.  

"चिंतनात्मक" म्हणजे जसे 'उपनिषद किंवा वेद' हे आपल्याला थोडक्या शब्दात काहीतरी सांगतात. त्यावर आपण चिंतन करणे व आयुष्याचा अर्थ किंवा ब्रम्हांडाचा ठाव घेणे अपेक्षित असते. 

 

हा ग्रंथ नक्की कुणासाठी आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला खालील उत्तरं मिळतात.

ज्यांच्या मनात स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीची ज्योत तेवत आहे, पण योग्य गुरूच्या शोधात आहेत, अशा साधकांसाठी हा ग्रंथ म्हणजे दिशा देणारा एक दीपस्तंभ आहे. काही लोक जीवनाच्या प्रवासात एका अज्ञात गोष्टीचा शोध घेत आहेत, पण नक्की कशाचा शोध चालू आहे, हेच त्यांना उमजत नाहीये. त्यांच्यासाठी या पुस्तकाची पाने आश्वस्त करणारी सोबत आहेत. दुसरीकडे असेही काही आहेत ज्यांना आध्यात्मिक मार्गदर्शक बनून समाजाची सेवा करायची आहे, पण नेमकं कुठून सुरुवात करावी, हे सुचत नाहीये. त्याना जनतेच्या मार्गदर्शनासाठी हा ग्रंथ मदतीचा हात देईल. नोकरी आणि व्यवसायाच्या धावपळीतून निवृत्त झाल्यानंतर आणि मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर रिकाम्या वेळेचे काय करावे, असा प्रश्न पडलेल्यांसाठी हा ग्रंथ एका नव्या अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात ठरू शकतो.
कधी कधी संसारातल्या कटकटींनी माणूस इतका वैतागतो की, संन्यस्त होण्याचे विचार मनात घर करू लागतात. पण संसाराचाही मोह सुतत नाही, मग मनाची एक विचित्र कोंडी होते. ज्यांना अशा पेचातून बाहेर पडायचे आहे, त्यांच्यासाठी हा ग्रंथ एक समतोल दृष्टी देतो. काही जणांच्या मनात पूर्वजन्माच्या आठवणींची पुटं असतात, त्यातुनच साधू-संतांची सेवा करावी किंवा धर्माचा प्रसार करावा अशी तीव्र ओढ त्यांना लागते. त्यांच्यासाठी हा ग्रंथ मूळ रुपातील मार्गदर्शकच आहे.
आपल्या आसपासच्या माणसांचे दुर्व्यवहार पाहून ज्यांना आयुष्याचा कंटाळा आला आहे किंवा ज्यांचे भले केले तेच लोक दुष्टपणे वागताना पाहून ज्यांच्या मनाला खोलवर जखमा झाल्या आहेत, अशा दुखावलेल्या मनांना हा ग्रंथ सावरण्याचे काम करेल. कुणी जवळची व्यक्ती सोडून गेल्यामुळे ज्यांच्या आयुष्यातील रस आणि आनंद हरवला आहे, त्यांच्या रिकाम्या आयुष्यात पुन्हा चैतन्याचे रंग भरण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे.
ज्यांना या विश्वाला काहीतरी देऊन स्वतःच्या जीवनाचे सार्थक करायचे आहे, अशा कीर्तनकारी किंवा श्री भगवद  गीता, रामायण इ. चे कथा वाचकां साठी... प्रत्येकासाठी हा ग्रंथ एक मौल्यवान ठेवा आहे.
सूचना: विचारपूर्वक खरेदी करावे. हा ग्रंथ म्हणजे कथा कादम्बरी नव्हे!

प्रस्तावना

 

केवळ प्रगल्भ वाचकांसाठी! हा ग्रंथ वाचकाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि

“बंधनाकडून मुक्तीकडे घेऊन जाईल”

 

उपनिषद, वेद, श्री भगवद  गीता यां बद्दलचे कुतुहल बालपणा पासूनच ज्यांना आहे. ते वाचण्याची इच्छा देखील आहे पण वेळे अभावी अथवा योग्य गुरु अभावी ज्यांच्या ज्ञानाचा गाडा रुतलेला आहे, अशा सर्वांसाठी हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे.  

प्राचीन भारतीय संस्कृति अन अथांग महासागरा प्रमाणे विशाल हिंदू धर्मशास्त्र तत्वज्ञान यातून नेमका कोणता भाग वाचावा याची चिंता सम्पवणारा हा ग्रंथ आहे. मौलिक विचारांचे सोपे विवेचनात्मक मोती या महासागरातून अतिशय परिश्रम करून डॉ. जोशी यांनी तुमच्या करितां वेचून आणले आहेत. म्हणूनच त्यांच्या शिष्यांना (व मलाही) ते प्रकांड पंडितभासतात.  

जगभर पसरलेले त्यांचे हजारो शिष्य गेली पस्तीस वर्षे त्यांच्या सम्पर्कात आहेत. जेव्हा लोकं गृहस्थी जीवनातील समस्या किंवा आध्यात्मिक प्रश्न विचारतात, तेंव्हा त्यांना समजले की एका सामान्य गृहस्थाला आध्यात्म विषयक कोणती जिज्ञासा असू शकते? 

ते प्रश्न गृहित धरून त्याची उत्तरे उपनिषद अन वेदांच्या माध्यमातून शोधण्याचा इथे प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे. या ग्रंथात अत्यंत अवघड व गूढ ज्ञान, सामान्य जनते साठी सोप्या भाषेत व आधुनिक जीवनाशी सांगड घालणारे असे सांगीतले गेले आहे. 

लेखकाची भाषा अत्यंत साधी सोपी आहे. कुठेही पांडित्याचा आव आणत गम्भीरतेने चर्चा केलेली नाहीय, तर हसत खेळत उपनिषद अन वेदांचे आवश्यक तेवढेच आकलन केले गेले आहे. उपनिषद किंवा वेद यांतील शब्दांचे अर्थ अनेक असतात. एक एक श्लोक प्रचंड ज्ञानाचा स्त्रोत आहे. त्यांच्या अर्था बाबत अनेक पंडितां मध्ये मतभेद असू शकतात. याची जाणीव लेखकाला आहे. त्या सर्व जाणकार गुरूंना आम्ही वंदन करतो.  

जसे एखादा कीर्तनकार अथवा कथाकार, पुराण कथेतील एक संदर्भ घेऊन आधुनिक जीवनाशी त्याची सांगड कशी घालावी हे श्रोत्यांना रुचेल पटेल अशा सुरस पद्धतीने सांगतो तसे या ग्रंथाचे स्वरूप आहे. 

यातून तुम्हाला स्वत:च्या क्षमता समजल्या, तुमच्या ब-याचशा शंकांचे निरसन झाले तरी पुष्कळ झाले. तुम्हाला अल्प का होईना पण उपनिषद, वेद यांचे ज्ञान झाले तरी पुष्कळ आहे. जे स्वयं घोषित गुरू असून या ग्रंथा मुळे ज्यांचा अहंकार डिवचला गेला आहे त्या गुरूंना डॉ. जोशी नेहमी सांगतात,माझी ज्योत निरांजना एवढी, माझा प्रकाश इतकाच! तुम्ही सूर्य असाल तर या ब्रम्हांडात तळपण्याचे काम करा. मी माझा खारीचा वाटा उचलला आहे. 

असो. प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाच्या मुळाशी एक चिरंतन प्रश्न दडलेला आहे. “मी कोण आहे? मी कुठून आलो आहे आणि कोणत्या कारणासाठी माझा जन्म झाला आहे? हा प्रवास नक्की कुठे चालला आहे? या ब्रम्हांडाच्या विस्तीर्ण पटलावर मी केवळ एक योगायोग आहे, की एका व्यापक चेतनेचा अविभाज्य भाग?” 

अनेकदा या प्रश्नांची उत्तरे शोधताना आपण बाह्य जगात, कर्मकांडात किंवा तत्त्वज्ञानाच्या गुंतागुंतीत स्वतःला हरवून बसतो. परंतु, खरे अध्यात्म हे बाह्य शोधाचा विषय नसून, ते अस्तित्वाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा एक प्रामाणिक प्रवास आहे. 

हा ग्रंथ म्हणजे केवळ ज्ञानाचे संकलन नाही, किंवा शास्त्रार्थ ही नाहीय, तर  जणू एका उच्च प्रतिच्या साधकाचे आत्मचिंतन आहे. इथे आपण बुद्धीच्या सीमा ओलांडून, पुढे जाणिवेच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. प्रकृतीची रचना समजून घेणे आणि तिच्या मर्यादा ओलांडणे ही या प्रवासाची पहिली पायरी आहे.  

आपण ज्याला वास्तव समजतो, ते वास्तव म्हणजे नक्की काय? आपल्या संवेदनांनी टिपलेले जग सत्य आहे की आपल्या मनाची एक निर्मिती 

माया कशा प्रकारे आपल्या चेतनेला झाकून ठेवते आणि आपल्याला द्वैताच्या चक्रात अडकवते, याचे तात्विक विवेचन येथे मांडण्याचा प्रयत्न आहे. 

या ग्रंथात आपण अनुभवकर्त्याच्या स्वरूपाचा शोध घेणार आहोत. कोण पाहतोय? कोण अनुभवतोय? आणि या अनुभवांच्या मागे असलेली चेतना नक्की कोणती? शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार हे घटक आपल्याला बांधून ठेवणारे पाश आहेत की आपली ओळख आहे 

जेव्हा आपण जीव आणि शिवाच्या ऐक्याचा विचार करतो, तेव्हा अद्वैताचे तत्व स्पष्ट होते. अद्वैत म्हणजे केवळ एक सिद्धांत नाही, तर ती एक अवस्था आहे, जिथे पाहणारा आणि पाहण्याचे दृश्य यांचे द्वैत विरून जाते. 

येथे आपण सूक्ष्म विज्ञानावरही चर्चा करणार आहोत.  

प्राण, नाडी, चक्रे आणि कुंडलिनी ही केवळ गूढ संज्ञा नसून, ते आपल्या अस्तित्वाचे ऊर्जा-विज्ञान आहे. या शक्तींचा तात्विक मेळ घातल्याशिवाय मुक्तीचे स्वरूप समजणे कठीण आहे.  

घर संसारात राहूनही अलिप्त राहणे, कर्माच्या चक्रातील गुंतागुंत समजून घेणे आणि अविद्यारुपी अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणे, ही साधनेची खरी कसोटी आहे. 

हा ग्रंथ वाचकासाठी एक आरसा आहे. यात मांडलेले विचार वाचताना कदाचित वाचकाला आपल्या अहंकारात अडथळे येतील, जुन्या संस्कारांच्या भिंती डळमळीत होतील.  

परंतु, हाच तर जागरणाचा मार्ग आहे. सत्य बाहेर शोधण्यापेक्षा ते आपल्या आत, या शरीराच्या आणि मनाच्या पलीकडे कसे दडलेले आहे, याचा हा एक गंभीर शोध आहे.  

पूर्वग्रहांची चौकट बाजूला ठेवून, ज्या क्षणी वाचक स्वतःच्या आत शांतपणे डोकावेल, त्याच क्षणी या ग्रंथाचा खरा उद्देश पूर्ण होईल. चला तर मग, या अथांग आणि चिरंतन सत्याच्या प्रवासाला निघू या. 

या प्रवासात आपण जेव्हा म्हणतो की 'मी' शरीर नाही, तेव्हा आपण अस्तित्वाच्या एका अथांग पोकळीत प्रवेश करतो. शरीर हे केवळ निसर्गाचे एक दृश्य साधन आहे, जे काळानुसार जन्माला येते आणि विलीन होते. परंतु, ज्याला या शरीराचा अनुभव होतो, तो अनुभवकर्ता या क्षयशीलतेच्या पलीकडे आहे.  

आपल्या बुद्धीचा आणि अहंकाराचा जो खेळ चाललेला असतो, तो या सत्याला झाकून ठेवतो. हे पुस्तक म्हणजे त्या अहंकाराला चिरडून टाकण्याचा प्रयत्न नसून, त्याला त्याच्या मूळ स्वरूपाशी, म्हणजेच त्या शुद्ध चेतनेशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे. 

जेव्हा आपण मुक्तीच्या किंवा आत्म-साक्षात्काराच्या गोष्टी करतो, तेव्हा बऱ्याचदा मनात एक भ्रम निर्माण होतो की, मुक्ती म्हणजे काहीतरी दूरवरचे साध्य किंवा मरणोत्तर अवस्था आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की मुक्ती ही आपल्या वर्तमानातील अज्ञानाचा अंत आहे. द्वैत आणि अद्वैत यातले अंतर मिटवणे म्हणजे जगाचा त्याग करणे नव्हे, तर जगाकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलणे होय. हीच ती जागृती आहे, जी आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारात, नातेसंबंधांत आणि कर्मांत एक अनाकलनीय शांती प्रदान करते.  

हा ग्रंथ वाचकाला  स्वतःच्या अंतरंगात स्थिर होण्याचे सामर्थ्य देईल, असा माझा विश्वास आहे. 

कृपया नोंद घ्यावी : हा ग्रंथ स्वयंघोषित गुरूंसाठी नाही!  

- माता देवी भगवती  

(देव भूमी हरिद्वार, ऋषिकेश)

 

 

Quality Assurance

Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.

Shipping

We offer free shipping on all orders.We are committed to delivering your order as quickly and efficiently as possible.

Delivery Timeline

Our delivery times vary depending on the destination and the shipping method selected. Please find the estimated delivery timelines below:

  • Standard Shipping: 5-7 business days

Note: Delivery times are estimated and may vary due to factors beyond our control.

Moneyback Guarantee!

Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.

Return Policy

You are entitled to cancel Your Order within 10 days without giving any reason for doing so.

The deadline for cancelling an Order is 10 days from the date on which You received the Goods or on which a third party you have appointed, who is not the carrier, takes possession of the product delivered.

In order to exercise Your right of cancellation, You must inform Us of your decision by means of a clear statement. You can inform us of your decision by:

  • By email: sales.majestyemporium7@gmail.com
View full details
  • Lowest Price offered!

  • Enjoy Free & Fast Shipping

  • Cash On Delivery Available!