नया सवेरा चॅरिटेबल टस्ट, उजळू दे नवी पहाट!

नया सवेरा चॅरिटेबल टस्ट, उजळू दे नवी पहाट!

तुम्ही खरेदी केलेल्या प्रत्येक पुस्तकातील नफ्याचा काही हिस्सा गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या साठी खर्च केला जातो.

आज आपण समृद्ध आहोत, पुस्तकं खरेदी करून वाचत आहोत पण आपल्या बाळपणी नवीन पुस्तक खरेदी करण हे देखिल एक स्वप्न असे. मोठ्या भावंडांची जुनी पुस्तकं लहान भावंडाना मिळत किंवा कुणातरी दुस-या विद्यार्थ्याची जुनी पुस्तकं अर्ध्या किमतीस घेऊन त्याला नवीन कव्हर घालून आपण अभ्यास करत असू. आपल्या आई बापानं कष्ट करून त्यांच्या मुलांची म्हणजेच आपली शिक्षणं पूर्ण केली. त्या मायबापाने स्वत: चप्पल खरेदी केली नाही पण मुलाना बुटं घेऊन दिली. 

आठवून पहा पहिला टीव्ही आयुष्यात कधी पाहीला? तो ब्लॅक अॅन्ड व्हाईट वाला, ज्यावर रविवारी जुना(ट) हिंदी सिनेमा असे, अन शनिवारी चार वाजता मराठी चित्रपट ! तेव्हा सर्व पोरी लवकरच विहिरीवरून पाणी भरायच्या, लवकरच कपडे धुवायच्या. पाटावर किंवा नदीवर एक मेकींच्या साहाय्याने गोधड्या धुतल्या जायच्या. नाहीतर आई टिव्ही बघायला 'जाऊन' देणार नाही. 

हो ना! टीव्ही हा दुस-याच्या घरात जाऊन बघावा लागे. कारण तो सतरा इंची टीव्ही म्हणजे श्रीमंतीच लक्षण होतं. मग ती श्रीमंत माणसं आपल्याकडे तुच्छतेने बघत आत घेत असत. आज आपल्या घरात सर्व सुख सोयी आहेत.

पण मित्रांनो आजही काही हुशार मुलं झोपडपट्टीत, आदीवासी पाड्यात रहातात त्यांच्या बालपणात त्यांना पोट चालवण्यासाठी मोल मजूरी करावी लागतेय. 

त्यांचा विचार आज आपल्या सारख्या सुखी माणसांनी नको का करायला. त्यासाठीच तर आम्ही काहीं लोकांनी मिळून "नया सवेरा चॅरिटेबल ट्रस्ट " स्थापन केली आहे. गेली अनेक वर्ष आम्ही या सामाजिक क्षेत्रात ताकतीनं काम करत आहोत. 

https://nayasavera.ideazunlimited.net

मजेदार गोष्ट म्हणजे जवळ जवळ प्रत्येकाच्या मनात समाजाची सेवा करणं असं येतं पण त्याला मूर्त स्वरूप मिळत नाही. काही उत्साही लोकांनी तर आपापली एन जी ओ रजिस्टर ही केलेली असते, आणि दरवर्षी त्याचे ऑडिट देखिल करतात. पण कोणतेही भरीव असे सामाजिक कार्य होत नाही. म्हणून समाजातील सेवाभावी लोकं अन गरजू घटक यांना एकत्रा आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. 

पण आमच काम मार्गदर्शकाचं (कोच) नसून फुटबॉल खेळणा-या कॅप्टन प्रमाणे आहे. की जो स्वत: ही खेळून आदर्श निर्माण करतो आणि दुस-याना ही प्रेरणा देत सर्वांसाठी 'विन विन' सिच्युएशन निर्माण करतो. 

याच संस्थे अंतर्गत "विश्व कल्याण' ही संकल्पना आपण राबवत आहोत. ज्यात प्रत्येकालाच सहभागी व्हायचे आहे. महाराष्ट्रा करिता सम्पर्क सूत्र, आदरणीय डॉ. शेंडे सर, ( शिक्षण तज्ज्ञ, वर्धा ) 9970107796 

यापुढील सामाजिक लेख वाचत रहा.. पुढील मार्गदर्शन घेत रहा. येथे याच वेबसाईटवर 

Back to blog